शाळासिद्धि कार्यक्रम विशेष
*सत्र २०१८ - २०१९ साठी शाळासिद्धी अंतर्गत शाळांचे स्वयंमूल्यमापन ऑनलाइन करण्याबाबत*
*_महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या २४ डिसेंबर २०१८ रोजी च्या पत्रान्वये सत्र २०१८ - २०१९ साठी राज्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकीकरण करणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे गरजेचे आहे . तसेच शैक्षणिक , भौतिक व संस्थात्मक गुणवत्तावाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शालासिद्धी हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये समृद्ध शाळा नावाने सुरू केलेला आहे . उपरोक्त शासन निर्देशानुसार प्रत्येक शाळेने दरवर्षी शाळांचे स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित आहे ._*
*सत्र २०१८-२०१९ साठी ३० जानेवारी २०१९ पर्यंत शाळा सिद्धि चे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे . त्यासाठी www.shaalasiddhi.nuepa.org या न्यूपा नवी दिल्लीच्या वेबपोर्टलवर आपल्या शाळेचे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे .*
*आपल्या अकोला जिल्ह्याचे कार्य देशात सर्वोत्तम असावे यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्वरित लॉगिन होऊन उपरोक्त वेबपोर्टलवर आपले स्वयंमूल्यमापन त्वरित करावे व त्याची माहिती पंचायत समिती मध्ये मा. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे द्यावी .*
🌹 *_स्वयंमूल्यमापन ३० जानेवारी २०१९ पूर्वी करावे_* 🌹
शाळासिध्दी
शाळासिध्दी कार्यक्रमाचे दोन टप्पे आहेत.
1) स्वयंमूल्यमापन
2) बाह्यमूल्यमापन
*स्वयंमूल्यमापन*
1) सन 2015-2016 या वर्षी आपण शाळा स्वयंमूल्यमापन केलेले आहे.
2) सन 2016 - 2017 या वर्षी देखिल आपण राज्यातील जवळपास 100 टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन केलेले आहे.
3) सन 2017- 2018 ची माहीती भरण्याची गरज नाही कारण वेबपोर्टल अपडेशन व NUEPA नवीदिल्ली यांचे धोरणानुसार सन 2016-17 व 2017- 18 ची माहीती एकत्रित करण्यात आलेली आहे.( आपण www.shaalasidhhi.nuepa.org या वेबपोर्टल मध्ये सदर माहीती 2016-2018 अशी झालेली पाहू शकता. )
4) सन 2018-2019 ची स्वयंमूल्यमापनाची माहीती आपणास भरावयाची आहे. करीता *शिक्षक निश्चिती व विद्यार्थी पट निश्चिती होणे आवश्यक आहे.*
*आपल्या शाळेची माहीती भरण्यासाठी वेबपोर्टल हे 365 दिवस सुरुच आहे*.
*आपल्या शाळेचा पट 30 सप्टेंबर या संदर्भ दिनांकावर निश्चित झाला म्हणजे आपण आपली माहीती सबमिट करावी*.
वरील सर्व बाबींसाठी शाळासिध्दी वेबपोर्टलवरील सूचनांचा वापर करावा.
( *बाह्यमूल्यमापन*- शाळांच्या बाह्यमूल्यमापनासाठी संपूर्ण देशातील शाळांचा (जवळपास पंधरा लक्ष) समग्र विचार करुन बाह्यमूल्यमापनाची पध्दती व टॅब वेबपोर्टलवर दिला जाणार आहे. यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.)
संपर्क अधिकारी
शाळासिध्दी.
No comments:
Post a Comment